अकलूजमधील पाणी पुरवठ्याची अपूर्ण योजना दहा दिवसांत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार—सुदाम आवारे
प्रतिनिधी—अकलूज—अकलूजमधील सर्वसामान्य माणसाला उच्च दाबाने पाणी मिळाले पाहिजे यासाठी साडे तेरा कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन कित्येक वर्षे झाली मात्र अकलूजमधील पाणी पुरवठा योजना अनेक वर्षे झाली पूर्ण होण्याचे नाव घेताना दिसत नसल्याचे मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी सांगितले आहे.
सदर योजना आजपर्यंत अपूर्ण स्थितीत असून मागास असलेल्या भागामध्ये व खरोखरच ज्या भागामध्ये ही योजना राबविणे गरजेचे असताना तिथे राबविण्यात आली नाही,आणि काही ठिकाणी तर बरेच दिवस योजनेचे फक्त पाईप आणून टाकले आहेत मात्र पाणी येण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार केली नाही त्यामुळे सदर योजना ही येत्या दहा दिवसांत पूर्ण करून त्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाणी उपलब्ध करुन न दिल्यास मनसेच्या वतीने अकलूज ग्रामपंचायत च्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी दिला आहे.
