आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना घुमराह केले–किरण साठे
प्रतिनिधी–सोलापूर–महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आपण सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या निमित्ताने आपल्या पक्षामध्ये असलेले लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याबद्दल थोडस माहितीसाठी व आपण प्रखरतेने शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रश्नावर नेहमीच सभागृहात आक्रमक भूमिका मांडत असता तुम्ही माझ्या मागणीची निश्चित दखल घ्याल अशी मला आशा आहे आशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी काढून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकामध्ये माळशिरस तालुक्यातील भाजपचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे चेअरमन असलेल्या सदाशिवनगर ता.माळशिरस येथील साखर कारखान्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाचे बिल आद्यपर्यत दिले गेले नाही,तसेच या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कित्येक वर्षे झाली त्यांची पगार देण्यातआली नाही.कारखाण्याची निवडणूक लढत असताना निवडणूक झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाची देणी व कामगारांच्या पगारी दिल्या जातील असे आश्वासन भाजपचे आमदार व सदाशिवनगर ता.माळशिरस येथील साखर कारखाण्याचे विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिले होते.त्या आश्वासनाला दीड वर्ष होऊन गेले आहे.तरी कामगार ऊस उत्पादक शेतकरी यांची देणी अजून देण्यात आली नाहीत,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी नमूद केले आहे.
भाजपचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेले आश्वासन फोल व खोटे ठरले असल्याने त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कारखाण्याचे कामगार यांना घुमराह केले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आपल्या पक्षामध्ये असलेले व आपल्या पक्षाने ज्यांना नुकतीच विधान परिषदेची आमदारकी दिली आहे त्यांना आपण सूचना करून सदाशिवनगर ता.माळशिरस येथील साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांची बिले व कामगारांना त्याचा हक्काचा पगार देण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
