
अकलूज आर टी ओ कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळे गेली आठ दिवस आंदोलन सुरू आहे – आदित्य काकडे
30 एप्रिल रोजी पोलीस आयुक्त पुणे,आर टी ओ पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
प्रतिनिधी:
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांनी दिनांक २० एप्रिल पासून अकलूज येथील गांधी चौक येथे अकलूज ते पुणे अवैध्य प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आले आहे. गेली आठ दिवस झाले आंदोलन सुरू असताना अकलूज आर टी ओ व अकलूज पोलीस स्टेशन यांच्या नाकावर टिच्चून अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यां भरून जात आहेत.या अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कुणाचे अभय आहे?याची अकलूज मधील सर्वसामान्य जनतेमध्ये सर्वत्र चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
अकलूज आर टी ओ आणि अकलूज पोलीस स्टेशन यांनी आंदोलन सुरू झाल्यापासून किती अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली आहे. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पोलीस स्टेशन आणि आर टी ओ कार्यालय यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तसेच अकलूज आर टी ओ कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळे पुणे येथील स्वारगेट वाहतूक शाखा,हडपसर वाहतूक शाखा यवत पोलीस स्टेशन,पाटस पोलीस स्टेशन आणि आर टी ओ कार्यालय पुणे यांना निवेदन देऊन अवैध प्रवासी वाहतूक कायमची बंद न केल्यास ३० एप्रिल रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय व पुणे आर टी ओ कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांनी दिला आहे.