आरपीआय गवई गटाची माळशिरस गेस्ट हाऊस येथे कार्यकरणी संपन्न

आरपीआय गवई गटाची माळशिरस गेस्ट हाऊस येथे कार्यकरणी संपन्न

माळशिरस –प्रतिनिधी—महाराष्ट्रामध्ये आरपीआय गवई गटाची घोडदौड डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गवई गटाचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत.माळशिरस तालुक्यामध्ये आरपीआय गवई गटाचेही काम जोरदार चालू आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश धाईंजे व जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये दत्ता सावंत यांची माळशिरस तालुका संपर्क प्रमुख पदी, मारुती शिंदे यांची माळशिरस तालुका सरचिटणीस पदी, तर शारदा शेगर महिला माळशिरस विभाग अध्यक्षपदी अशा निवडी केलेल्या आहेत.यावेळी प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेशचे सचिव श्रीकांत सावंत, ज्येष्ठ नेते दत्ता सावंत, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब धाईंजे, तालुका युवक अध्यक्ष वैभव धाईंजे, महिला तालुका अध्यक्ष रुक्मिणीताई रणदिवे, तालुका कार्याध्यक्ष संजय धाईंजे, तालुका युवक कार्याध्यक्ष दादा सावंत, तालुका उपाध्यक्ष नाना तोरणे व विकास धाईंजे, तालुका युवक उपाध्यक्ष अजय धाईंजे, नारायण समिंदर, माळशिरस शहर अध्यक्ष मोहिनेश धाईंजे, नानासो ओहाळ आदी कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.माळशिरस तालुक्यामध्ये आरपीआय रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे संघटन मजबूत करून गाव वाड्या वस्त्या येथे शाखा काढून गवई गटाच्या पक्षाची बांधणी डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली करून तळागाळांमध्ये पक्षाचे ध्येय धोरण पोहोचण्याकरता सर्वांनी प्रयत्न करावे, असे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश धाईंजे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका युवक अध्यक्ष वैभव धाईंजे यांनी केले, तर आभार तालुका अध्यक्ष आप्पासाहेब धाईंजे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom