अधीक्षक अभियंता यांनी घेतला बहुजन ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनाचा धसका
पंढरपूरचे कार्यकारी अभियंता यांना दिले चौकशीचे आदेश
प्रतिनिधी : करकंब : बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलापूर जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देऊन १७ मार्च रोजी आंदोलन आयोजित केले होते.बहुजन ब्रिगेड संघटनेची आक्रमक भूमिका पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता रा.ति. जमादार यांनी तात्काळ दखल घेऊन आंदोलनाचा धसका घेतल्याचे पाहायला मिळाले.
प्रभारी अधीक्षक अभियंता रा.ति. जमादार यांनी पंढरपूर येथील कार्यकारी अभियंता यांना करकंब ते मोडनिंब या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अहवाल सोलापूर अधीक्षक कार्यालयात सादर करण्यासाठी आदेश दिला आहे,त्यामुळे चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर मंडळ यांनी घेतली आहे,मात्र रस्त्याच्या कामाची चौकशी निःपक्षपातीपणाने झाली नाही तर पुणे येथील मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर येत्या आठ दिवसात पंढरपूर चे कार्यकारी अभियंता,संबंधित कामाची जबाबदारी असलेले उपअभियंता,शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले.
