अजनसोंड येथे दिवंगत शनी बंगाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी : दि.24/6/रोजी पंढरपूरचे डि.वाय .एस.पी. विक्रम कदम व तहसीलदार बेलेकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन केले. प्रथम ग्रामस्थांच्यावतीने विक्रम कदम यांचा सत्कार गावचे सरपंच व माजी सैनिक जयद्रथबंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला. तहसीलदार यांचा सत्कार उपसरपंच संजय सोनटक्के व मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ची मुख्य कार्यकारी अधिकारी जोशीसाहेब व पं.समिती सदस्य माधव चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला . याप्रसंगी 51 जणांनी रक्तदान केले व 50 वृक्षांचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी गावातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक लक्ष्मण बंगाळे. प्राध्यापक भास्कर बंगाळे भिमशाहीर देवीदास बंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच दत्तात्रय घाडगे तुकाराम डुबल. तानाजी शिरगीरे विजय बंगाळे दत्तात्रय गाडे. विठ्ठल डुबल. भूपाल मोरे डॉ.राम बंगाळे ग्रामसेवक कांबळेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वितेसाठी अतूल गायकवाड दिलीप बंगाळे आकाश बंगाळे गनेश कांबळे सचिन मोरे पंडित बंगाळे योगेश बंगाळे बबलू बंगाळे आदींनी परिश्रम घेतले.

