अकलूज येथील कार्यालयात प्रांताधिकारी म्हणून नामदेव टिळेकर यांची नियुक्ती
अखेर किरण साठेचा पाठपुरावा यशस्वी
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विभागीय आयुक्त यांचे किरण साठेंनी मानले आभार
प्रतिनिधी : : अकलूजमधील प्रांत कार्यालय येथे पूर्वी प्रांताधिकारी म्हणून २१/९/२०२१ पासून नियमित डॉ विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र ते सतत रजेवर असल्याने त्यांच्या जागेवर माढा येथील कार्यरत असलेल्या ज्योती कदम यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नोव्हेंबर २०२२ मध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन करून अकलूजमधील कार्यालयात नियमित प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.
सदर आंदोलनाची दखल घेवून १२ डिसेंबर २०२२ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागाच्या उपायुक्त नयना बोंदार्डे यांनी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्रव्यवहार करून उपजिल्हाधिकारी सवंर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना शासन,महसूल व वनविभाग सक्षम असल्याने पद स्थापना देणे,अनियातकालिक व मुदतपूर्व बदली चे अधिकार हे शासनास आहेत त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी कार्यालयास केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासाठी सादर करण्यात आल्याचे लेखी पत्र देण्यात आले होते. त्यामुळे किरण साठे यांनी या प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अकलूजमधील कार्यालायत नियमित प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेही पत्रव्यवहार करून मागणी केली होती,त्याची पूर्तता झाली असल्याने विभागीय आयुक्त कार्यालय आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आणि इतर पक्षातील पदाधिकारी यांनीही आपल्या परीने मागणी केली होती त्यांचेही किरण साठे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

