अकलूजमध्ये मातंग समाज व विविध संघटनांचा भव्य मोर्चा

अकलूजमध्ये मातंग समाज व विविध संघटनांचा भव्य मोर्चा

माळेवाडी येथील अंत्यविधीसाठीचा रस्ता अडवणूक प्रकरण

प्रतिनिधी : अकलूज :

माळेवाडी बोरगाव तालुका माळशिरस येथील मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला अंत्यविधीसाठी नेताना रस्ता अडवणूक केली यासंदर्भात अकलूज पोलिसांकडून संशयित गुन्हे दाखल झाले आहेत,परंतु अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही,त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज व विविध संघटना यांच्या वतीने अकलूज प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

माळेवाडी बोरगाव येथील साठे कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे पुर्नवसनकरून,आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील समस्त मातंग समाज सर्व सामाजिक,राजकीय,संघटना संस्था,यांच्या कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यासाठीधडक मोर्चात सामील झाले होते.आरोपींना अटक करण्यात यावी,पीडित कुटूंबाचा पुरवणी जबाब त्यांच्या भाषेत घ्यावा,तपास अधिकारी बदलून,मिळावा,फिर्यादी,आणि साक्षीदार यांना खटलापूर्ण होईपर्यंत पोलीस बंदोबस्त द्यावा,माळेवाडी गाव अत्याचार प्रवणक्षेत्र घोषित करावे, ॲट्रॉसिटी दाखल असलेल्या आरोपींचे जमीन अर्ज नामंजूर करण्यासाठी तात्काळ सर्वोच्य न्यायालयात अपील दाखल करावेसरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी,गावातील स्मशानभूमी पर्यंत रस्ता पंधरा दिवसात करावा यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.सदर मोर्चा चे निवेदन पीडित कुटुंबातील सदस्य यांच्या कडून उपविभागीय अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी स्वीकारले.

यावेळी माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे,लहुजी शक्ती सेना चे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे,मातंग परिषद चे अध्यक्ष ज्ञानदेव खंडागळे,पुणे महानगरपालिकेचे पक्षनेते सुभाष जगताप बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे रिपब्लिकन क्रांती सेनेचे अध्यक्ष लोखंडे,राष्ट्र विकास सेनेचे प्रशांत सदामते,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट,लक्षवेधी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल साठे प्रदेशाध्यक्ष बंटी भिंगारदिवे एन डी एमजी चे सचिव वैभव गिते आरपीआय राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे प्रा.धनंजय साठे,दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजू खिलारे,मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, नगरसेवक भीमराव साठे,विकास धाइंजे,सोमनाथ भोसले,जयसिंग म्हस्के,उमाजी मिसाळ,महादेव तुपसौंदर,बाळू सपताळे,सागर लोखंडे,वंचित बहुजन आघाडीचे अभिजित गायकवाड,धवल कांबळे,उदय कांबळे,शेखर खिलारे,किरण धाइंजे,नरेंद्र भोसले,किर्तीपाल सर्वगोड सागर लोखंडे,नाना रणदिवेतसेच प्रामुख्याने मातंग समाजाचे हजारो कार्यकर्ते व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अकलूजमधील मोर्चाचे आयोजन लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे व वंचित चे अभिजित गायकवाड यांनी केले होते.

माळेवाडी प्रकरणाच्या अनुषंगाने अकलूज मध्ये मातंग समाज व विविध संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या मोर्चा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नव्हता आणि कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या विरोधात तो मोर्चा नसून एखादया व्यक्तीच्या मनामध्ये असलेल्या वाईट विचार,प्रवृत्ती, आणि कटुनीतीच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

किरण साठे
संस्थापक अध्यक्ष-बहुजन ब्रिगेड संघटना
सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा

माळेवाडी बोरगाव येथील प्रकरणात अकलूज येथील प्रांत कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा माळशिरस तालुका, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कार्यकर्ते व विविध प्रकारच्या सामाजिक, राजकीय,संघटनां व संस्था यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा कुणाचाही नेतृत्वाखाली काढण्यात आलेला नव्हता त्यामुळे कुणीही या मोर्चाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करून नये हा मोर्चा समस्त मातंग समाज व बहुजन समाज बांधवांनी यशस्वी होण्यासाठी सहभाग नोंदवला आहे.त्यामुळे कुणीही मोर्चाचे श्रेय घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही.

महादेव तुपसौंदर
जिल्हाध्यक्ष-सोलापूर
लहुजी शक्ती सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom