एक गाव एक पंचर दुकान ही योजना प्रशासनाने राबवावी—दत्ता कर्चे

एक गाव एक पंचर दुकान ही योजना प्रशासनाने राबवावी—दत्ता कर्चे

प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस तालुक्यातील पंचर दुकाने चालू करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन दिले आहे. देशासह महाराष्ट्र राज्यात लॉक डाउन झाल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या गोष्टी चालू असून त्यामध्ये मालवाहतूक,शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारी वाहने,तसेच शासकीय रुग्णालयात कामाला असणारे कर्मचारी,अंबुलन्स,सरकारी १०८ गाडी,किराणा दुकान,पेट्रोल पंप व अनेक गोष्टी चालू आहेत. मात्र या सर्व अत्यावश्यक सेवा ज्या वाहनातून केली जाते त्या वाहनांमधून एखादा रुग्ण हा अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या वाहनांमध्ये नेत असताना गाडी पंचर झाली,आणि तो वेळेत पोहचला नाही तर त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,तसेच शेतकऱ्यांनी आपला माळव्याचा माल विकण्यासाठी आणताना ती वाहन पंचर झाली तर त्याचा माल वेळेवर मार्केट किंवा मंडई मध्ये न पोहचल्यास त्याचेही नुकसान होणार आहे, त्यामुळे या चालू असलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये ज्या घटकांना पेट्रोल,डिझेल देण्याची सोय केली आहे,अशा सर्व घटकांना ही सेवा देण्यासाठी एक गाव एक पंचर दुकान अशी योजना आपण राबविण्यात यावी अशी मागणी दत्ता कर्चे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom