
माळशिरस तालुक्यातील कोरोना बाबत च्या जनजागृती साठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार- पै.अक्षय भांड
(युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका)
प्रतिनिधी—माळशिरस—कोरोनाचे संकट आज उभे आहे त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी वर्ग प्रत्येक भागामध्ये लोकांनच्या अडचणी सोडण्याचे काम करत आहेत तसेच , कोरोना संबंधी जनजागृती करण्याचे काम देखील करत आहेत त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनच्या अडचणी बघुन ज्या त्या भागामधीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व प्रशासनातील आधिकारी यांच्या मध्ये समन्वय साधुन ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पै.अक्षय भांड सक्रिय पणे काम करत आहेत,त्याच प्रमाणे माळशिरस तालुक्यातील नागरिकांनच्या व शेतकरी वर्गाच्या सध्याच्या परिस्थिती चा आढावा त्यांनी घेतला या सर्व परिस्थिती बाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार, तसेच सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत चर्चा केल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व तसेच वेळोवेळी माळशिरस तालुक्यातील परिस्थिती चा आढावा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.