
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने थंड पाण्याचा वापर टाळण्याचे किरण साठे यांचे आवाहन
प्रतिनिधी—अकलूज—देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना व्हायरस च्या साथीने हैदोस घातलेला आहे,या व्हायरसची सर्दी,खोकला,ताप,निमोनिया या आजारासारखी लक्षणे आहेत,या आजाराचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने उपाययोजना केल्या आहेत, तसेच काही सूचनाही केलेल्या असून त्या सूचनांचे आपण सर्वजण पालनही करीत आहे, मात्र आपण या राज्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याने सर्व जनता घरीच बसून राहिली आहे,हे सरकारच्या सूचनांचे पालन आपण करीत आहोत याबद्दल सर्व जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी आभार मानले आहेत.
आपण घरी असल्याच्या दरम्यान थंड पाणी पिणे,थंड पाण्याने अंघोळ करणे टाळले पाहिजे, याचे कारण थंड पाणी पिल्याने किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्याने आपल्याला सर्दी होण्याची शक्यता असते, त्याबरोबर सर्दी झाल्यानंतर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते, आणि घश्यामध्ये दुखावा निर्माण होऊ शकतो तसेच त्यामुळे खोकला व खोकल्यामुळे छातीत कफ होण्याची शक्यता असते,आणि कफ झाल्यामुळे निमोनिया होण्याची दाट शक्यता असते,म्हणून वरील सर्व लक्षणे ही कोरोना व्हायरसच्या विषाणूची आहेत,म्हणून आपणाला हे आजार जडू नये किंवा याची लागण आपल्याला होऊ नये म्हणून आपण थंड पाण्याचा वापर शक्यतो टाळता येईल तेवढा टाळावा व जनतेला आपली काळजी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केले आहे.