
खाजगी बचत गट किंवा गाडीचे फायनान्स खाजगी सावकार यांच्या जनतेला घेऊन मुसक्या आवळणार:-पिनू भाऊ येडगे
प्रतिनिधी—वेळापूर—बँक फायनान्स कंपन्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या मोबाईल कर्ज सर्वच इलेक्ट्रॉनिक कर्ज व इतर कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्या लोकांना त्रास दिल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे कोरोना संकटाचा सामना देशातील महाराष्ट्रातील सर्व नागरिक करत आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू लाॅक डाऊन सारखे आणि चांगले मोठे निर्णय घेतले त्यामुळे कोरोनाव्हायरस बंद होऊ शकतो महाराष्ट्रातील जनतेने सरकारचे आभार मानले आहे. पण महाराष्ट्रामध्ये काही मोल मजूर करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना कामावर,पगार, उपासमारी ला सामोरे जावे लागत आहे सर्वांचे गाड्यांचे 99% अन्य धंदे बंद झाले आहेत या महिन्यात व्यवसाय खूप कमी झाला आहे घरखर्च सोडाच पण एके वेळी जेवणाचे देखील प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. संबंधित सहकारी बँक फायनान्स कंपन्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या बचत गटाच्या नावाने महिलांना कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी सावकारी फायनान्स कंपन्या यांना वसुली न करण्याचे आदेश द्यावेत लाॅक डाउन मधील जनतेला सहकार्य करावे असे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक जिल्हा सरचिटणीस पिनु भाऊ येडगे यांनी सांगितले भविष्यात संबंधित कंपन्यांना लॉक डाउन उठल्यानंतर हप्ते भरा असेही त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले जर जाणून-बुजून कोणी सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यावतीने संबंधित बँक फायनान्स कंपन्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या बचत गटाच्या नावाने महिलांना कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी सावकारी फायनान्स कंपन्या यांच्या मुसक्या आवळणार असेही त्यांनी सांगितले.