
माळशिरस-तिरवंडी रस्त्याचे काम शामराव बंडगर,सरपंच नवनाथ कचरे,बंटी लवटे यांच्या अथक प्रयत्नांमुळे लवकरच सुरू होणार
माळशिरस तिरवंडी रस्त्याचे काम ग्रामपंचायत सदस्य तिरवंडी शामराव बंडगर,सरपंच नवनाथ कचरे कचरेवाडी, उपसरपंच बंटी लवटे,यांच्या अथक प्रयत्नामुळे लवकरच सुरू होणार गेली दोन वर्ष पाठपुरावा करून अखेर रस्त्याचे मोजमाप आज दिनांक 20/03/2010 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आले. सातारा-लातूर या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे मेघा कंपनी करीत होते ते जवळपास पुर्ण होत आलेले आहे. कामासाठी लागणारा कच्चामाल खडी वाळू याची वाहतूक तिरवंडी या ठिकाणाहून होत होती तिरवंडी ते माळशिरस अंतर 7 किलोमीटर आहे हा रस्ता 3.75 मी रुंदीचा लहान असून या रस्त्यावरून वाहने टिपर खूप मोठे असल्यामुळे रस्ता शिल्लक राहत नाही रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून या रस्त्यावरून 40 टन कच्चामाल घेऊन टिप्पर वाहतूक करीत होते तसेच रोडवर वाळू खडी टिपर मधून रस्त्यावर ती पडत असल्या कारणाने शालेय विद्यार्थी नागरिकांना प्रवास करणे खूप धोक्याचे होते तसेच तिरवंडी येथे शिक्षण नसल्यामुळे हजार विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माळशिरस याठिकाणी येत होते रस्त्यावर वाहनातून मोठ्या प्रमाणात खडी वाळू पडत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती तसेच त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता शामराव बंडगर ग्रामपंचायत सदस्य तिरवंडी यांनी माळशिरस तहसीलदार यांना 27/08/2018 व 06/09/2018 त्यांना कळवले होते तसेच 11/01/2019 रोजी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना ही पत्राद्वारे कळवले होते त्या अनुषंगाने त्यांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला तसेच आज अखेर तिरवंडी माळशिरस या रस्त्याचे माप घेण्याचे काम चालू झाले असून तिरवंडी व कचरेवाडी या गावांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ना आनंद झाला आहे कारण गेली कित्येक वर्ष रखडलेल्या रस्त्याचे काम अखेर पूर्ण होतंय यामुळे लोकांना खूप आनंद झाला आहे. तिरवंडी गावचे नागरिक कचरेवाडी गावचे नागरिक यांच्या सहकार्यामुळे तसेच वेळोवेळी पाठपुरावा करणारे शामराव बंडगर यांच्या प्रयत्नामुळे अखेर या रस्त्याचा मोजमापाची आज सुरुवात झाली आहे तसेच लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होणार असेही त्यांनी बोलताना सांगितले.