अन्यथा गणेशनगर ते सदुभाऊ चौक रस्त्याला जि.प.सदस्य, पं.स.सदस्य व सरपंच यांचे नाव देणार—उदय कांबळे

अन्यथा गणेशनगर ते सदुभाऊ चौक रस्त्याला जि.प.सदस्य, पं.स.सदस्य व सरपंच यांचे नाव देणार—उदय कांबळे

प्रतिनिधी—अकलूज—गणेश नगर ते सदुभाऊ चौक रस्ता त्वरित दुरुस्त करावे अन्यथा त्या रस्त्याला जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,अकलूज ग्रामपंचायत चे सरपंच यांची नाव देणार असल्याचे बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी अकलूज ग्रामपंचायत ला निवेदन दिले आहे.सदर निवेदन ग्रामपंचायत चे बाळू वाईकर यांनी स्वीकारले, यावेळी धवल कांबळे इत्यादी उपस्थित होते.

अकलूजमधील गणेश नगर ते सदुभाऊ चौक या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर नादुरुस्ती झालेली असून सदर रस्त्यावरून हजारो विद्यार्थी व पालक ये-जा करीत असतात त्याचप्रमाणे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहनचालक यांचे अपघात झालेले आहेत,या रस्त्यावरून स.मा.वि. तसेच प्राथमिक शाळा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वरदळ असल्याने हा संबंधित गणेश नगर ते सदुभाऊ चौक हा रस्ता अकलूज ग्रामपंचायत चने त्वरित दुरुस्त करावा अन्यथा येत्या १० ते १५ दिवसात या रस्त्याला अकलूज जिल्हा परिषद सदस्य,या गणाच्या पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत चे सरपंच यांचे नाव देऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी दिला आहे सदर निवेदनाच्या प्रति मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती माळशिरस यांना पाठविल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom