
माळशिरस तालुक्यातील मायक्रोफायनान्स व
बचत गटाची वसुली त्वरित थांबविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
-पिलीव पुढारी व्रत्तसेवा
–माळशिरस तालुक्यात प्रामुख्याने अकलूजमधील मायक्रोफायनान्स व आठवडा बचत गटाची कर्ज दिलेली आहेत व हप्ता वसुलीही जबरदस्तीने वसुली केली जात आहे कोरोना साथीच्या रोगाला प्रतिबंध करणे साठी संपूर्ण कामकाज ,दुकाने, हाँटेल्स मजूरी मिळण्याची साधने बंद पडु लागली आहेत तरी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन दिले आहे.निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे प्रभारी नायब तहसीलदार एस जी बनसोडे यांनी स्वीकारले.यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे,आनंद एकतपुरे,कोळी महासंघाचे सागर कोळी,बहुजन ब्रिगेडचे शहराध्यक्ष उदय कांबळे,इमरान मुलाणी,रफिक शेख,धवल कांबळे,जाकीर शेख,साहिल अडगळे,कुमार कांबळे,इत्यादी उपस्थित होते.
देशामध्ये कोरोना व्हायरसच्या आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून त्याचे पडसाद आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उमटलेले असून अनेक रुग्ण कोरोना ची लागण झालेले आढळून आलेले आहेत,त्याची खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी जमावबंदी केली आहे,तसेच शक्य असल्यास घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतअसे निवेदनात नमूद केले आहे.
सर्वसामान्य व गरीब जनतेला रोज कामाला गेल्याशिवाय त्यांचे घर चालविणे अवघड असते आशा गरीब व सर्वसामान्य जनतेने आठवडा बचत गट,मायक्रोफायनान्स च्या माध्यमातून कर्ज घेतलेली आहेत,त्यांना या कोरोना व्हायरस मुळे हाताला काम मिळेनासे झाले असल्याने व या कोरोनाची भीती निर्माण झाल्याने त्यांना काम मिळेनासे झाले आहे,तरी माळशिरस तालुक्यातील सर्व आठवडे बाजार,मार्केट कमिटीचे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत,त्यामुळे माळशिरस तालुक्यासह प्रामुख्याने अकलूजमधील मायक्रोफायनान्स व आठवडा बचत गटाच्या प्रतिनिधींना बोलावून या कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत या सर्वसामान्य व गरीब जनतेला हप्त्यासाठी
वसुली,व तगादा लावू नये आशा सूचना देण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे