शरद पवार हे चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नातही येत आहेत–किरण साठे

शरद पवार हे चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नातही येत आहेत–किरण साठे

प्रतिनिधी—पुणे—देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीही सत्तेची हवा आपल्या डोक्यामध्ये जाऊ दिली नाही,सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महत्व देने व ते प्रश्न सोडवणे एवढेच काम सत्येच्या माध्यमातून शरद पवार यांनी केले आहे.गेल्या पाच वर्षात सत्तेत नसताना सुध्दा शरद पवार यांनी केलेल्या कामाचा विसर चंद्रकांत पाटील यांना पडल्याचे दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी म्हटले आहे.

याउलट भाजपचे सरकार हे २०१४ साली महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले,आणि त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली अनेक फसवी आश्वासने भाजप सरकारने या राज्यातील जनतेला व शेतकऱ्यांना दिली आणि महाराष्ट्र जणू आपल्या बापाचाच आहे असे भाजपचे मंत्री,आमदार वागायला लागले होते.

मस्तवालपणाने वागण्यात चंद्रकांत पाटील ही सर्वात पुढे होते,त्यांनीही सत्तेच्या मस्तीत अनेक अकलेचे तारे तोडणारी विधाने केली होती,तसेच सत्तेचा माज करणारे सरकार म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली होती.

शरद पवार यांचे राजकारण संपविण्याची भाषा करणारे चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यात निवडून येण्याची शक्यता नसल्याने शेफ मतदान संघ म्हणू कोथरूड मतदारसंघातुन निवडणूक लढवली,शरद पवार यांचे राजकारण संपवणार म्हणणारे चंद्रकांत पाटील यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपची विधानसभा निवडणुकीत काय अवस्था झाली आहे,हे पहावे आणि मग पवार साहेब यांच्यावर बोलावे,सत्तेत असताना चर्चेत राहण्याची सवय चंद्रकांत पाटील यांना झाली असल्याने ते शरद पवार यांच्याबद्दल बोलून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी केलेले प्रयत्न हे यशस्वी झाल्याने व सरकार स्थापन करण्याच्या भूमिकेत केंद्र स्थानी व किंगमेकर ची भूमिका पार पडल्याने व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांना पचनी पडत नाहीत हे सिद्ध झाले आहे,शरद पवार यांनी भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांच्या हातून काढून घेऊन त्यांनाच उपाशी ठेवल्याने त्यांनाच आता पाच वर्ष उपाशी बसावे लागणार आहे, याची जाणीव बहुतेक चंद्रकांत पाटील यांना झाली असावी म्हणूनच त्यांनी असे विधान केले असावे.शरद पवार हे चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नातही येत आहेत,अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे, तसेच सत्ता घेल्याने चंद्रकांत पाटील हे बावचळल्यावाणी काहीही बोलत आहेत,यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल काही आक्षेपार्ह शब्द वापरल्यास चंद्रकांत पाटील यांना मोठी किंमत मोजावी लागेल असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom