
तिरवंडी मध्ये महापुरामुळे झालेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळवून देणार:- शामराव बंडगर
प्रतिनिधी—माळशिरस—तिरवंडी मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान भरपाई अजून लोकांना मिळाली नाही त्यामधील शेतकऱ्यांची नावे भागवत पांडुरंग वाघमोडे, शंकर भानुदास सरगर, संतोष ज्ञानेश्वर सरगर, तुकाराम मारुती वाघमोडे, लक्ष्मण मारुती वाघमोडे, रामचंद्र सदाशिव वाघमोडे, रामदास मारूती वाघमोडे, दिनकर भाऊ वाघमोडे, दशरथ भाऊ वाघमोडे, ज्ञानदेव मारुती वाघमोडे, सोमनाथ ज्ञानदेव वाघमोडे, अंकुश हरिबा सरगर. रामचंद्र हरी सरगर, देविदास दिनकर वाघमोडे, दयानंद विश्वनाथ नरूटे, विजय विश्वनाथ नरूटे, शंकर भानुदास माने, बापू सावळा वाघमोडे, पंढरी सावळा वाघमोडे, भिवा सावळा वाघमोडे गावांमधील अजून अनेक बाधित शेतकरी आहेत तेसुद्धा निधी पासून वंचित आहेत.तरी त्यांचा मोबदला माननीय आमदार रामहरी रुपनवर व उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून व माध्यमातून जे शेतकरी मोबदल्यापासुन वंचित राहिले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळवून देणार असे आज 24 तास शी बोलताना तालुका काँग्रेस कमिटी सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य तिरवंडी शामराव बंडगर असे सांगितले.जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसेल संबंधित विभागासमोर शेतकऱ्यांना घेऊन आक्रमक भूमिका घेणार.