धर्मपुरी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक,ठेकेदार यांच्यवरती कारवाई करण्यासाठी बहुजन ब्रिगेडचे सोलापूर येथे २४तारखेला आंदोलन
प्रतिनिधी—नातेपुते—धर्मपूरी ग्रामपंचायतीने एलईडी बल व साहित्य खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी केलेला अहवाल घेवून व तसेच राहिलेल्या चौकश्या त्वरित करून संबंधित ठेकेदार,ग्रामसेवक,सरपंच यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या भ्रष्टाचार प्रकरणातील ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून,संबंधित ग्रामपंचायत सरपंचाचे सरपंच पद त्वरित रद्द करण्यात यावे,तसेच या प्रकरणातील धर्मपुरी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळशिरस तालुकध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर मुख्याधिकारी वायचळ यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात येत्या 24 नोव्हेंबर रोजी या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.