
फुरसुंगी स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने महिला दिन साजरा
प्रतिनिधी:- स्वयंभू फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री. संतोष भाऊ हारपळे यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ साजरा करण्यात आला ह्या कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग होता. सदर कार्यक्रमात सिध्दी रोहाऊस,पावरहाऊस, शिवनेरी हाईट्स, साजई पर्ल,कमल विश्व,एकनाथ पुरम,एकनाथ विश्व,कुणाल हाईट्स, कोमल प्लाझा,लक्ष्मी कमल पॅलेस,शांती हाईट्स, समर्थ पॅलेस,मुक्ताई रिसेडेन्सी, स्वयंभू रिसेडेन्सी, महेशनगर,पापडेवस्ती,ढमाळवाडी, संकेत विहार,गणेश नगर,काजल हाईट्स,भोसले व्हिलेज, इत्यादी भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आसलेल्या मंगल फराटे,उज्वलाताई हरपळे, हर्षदा विवेक बेदरकर,सुनीताताई गायकवाड, रेश्मा आबनावे,सारिका शितोळे,संगीता वाघूले,सुजाता जगताप, विमलताई पाटील, संगीता चिंधे,उषाताई इंगरे,पुनम पांगे या महिलांचाऐ सन्मान चिन्ह, सन्मान पत्र,शाल,श्रीफळ, गुलाब पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या वेळी मनपा नगरसेवक स्थायी समिती सदस्य मारुती आबा तुपे, नगरसेवीका व नुतन स्थायी समिती सदस्या सौ उज्ज्वला ताई जंगले, हंबीरराव मोहिते गो शाळा संस्थापक अध्यक्ष मा. पंडित दादा मोडक तालुका अध्यक्ष भाजपा धनंजय कामठे, यांची भाषने झाली या वेळी नगरसेवक मारूती आबा तुपे यांनी सांगीतले की संतोष भाऊ हरपळे यांच्या स्वयंभू फाऊंडेशन चे कार्य कौतुकास्पद आहे फुरसुंगीतील विविध समस्या साठी संतोष हरपळे वेळोवेळी झगडत असतात आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यांच्या मागण्यांचा आम्ही पुणे महानगरपालिकात पाठपुरावा करुन संतोष भाऊ हरपळे यांच्या स्वप्नातील फुरसुंगी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे या वेळी उपस्थित भाजपा नेते सुभाष जंगले, धनंजय कामठे, डाॅ बाळासाहेब हरपळे, बेरोजगार भूमीहीन संघटनेचे अध्यक्ष संजय रणदीवे,श्रीकांत महाडीक, तानाजी पाटील स्वयंभू फाऊंडेशन,मा.संतोष भाऊ हारपळे युवा मंडळ व आदेश युवा मित्र मंडळाचे कार्यकर्त्ये तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन सतीश जगताप व आभार प्रदर्शन धनंजय कामठे यांनी मानले
