मळोली ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी अकलूजमध्ये ठिय्या आंदोलन

मळोली ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी अकलूजमध्ये ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी–लवंग—मळोली ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी ठिय्या आंदोलन केले,त्या आंदोलनाला अनुसरून उपअभियंता केदार यांनी त्यांना लेखी पत्र दिले आहे,त्या पत्रामधील मजकूर हा मान्य नसल्याने व संबंधित काम निकृष्ठ दर्जाचे असताना संबंधित एजन्सीधारकाला पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ येत्या २४ तारखेला मुख्य अभियंता पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना किरण साठे यांनी दिले आहे.

सदर आंदोलनाला आंदोलनाला भारतीय दलित महासंघ,मनसे यांनी पाठिंबा दिला,यावेळी बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे,भारतीय दलित महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष उमाजी मिसाळ,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,मनसे लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,बहुजन ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे,जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे,तालुकाध्यक्ष धनाजी पाटील भारतीय दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष आकाश लोखंडे,उदय कांबळे,सागर कोळी,बंडू कांबळे,नितीन भिसे,भैय्या साठे,किसन माने,विकास केसकर,अनिल केंगार इत्यादी उपस्थित होते.

चौकट
माझ्या आंदोलनाला अनुसरून उपअभियंता केदार साहेब यांनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये मळोली ते निमगाव रस्त्याच्या खडीकरणाच्या कामामध्ये वापरलेल्या खडी व डांबर याची शासकीय प्रयोगशाळा सोलापूर येथुन तपासणी करून मानकानुसार योग्य निष्कर्ष प्राप्त करून न घेताच वापरले असल्याचे सिद्ध होत आहे, म्हणजेच हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत आहे,आणि आता केदार साहेब या एजन्सीधारकाला खडी व डांबर योग्य निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतरच वापरण्याची सूचना दिल्याचे सांगितले आहे, म्हणजेच खडीकरणाच्या कामामध्ये अनियमितता असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे मी येत्या २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर कार्यकारी अभियंता, उपअभियंता,शाखा अभियंता यांना निलंबित करण्याचा मागणीसाठी आंदोलन करणार आहे.किरण साठे
जिल्हा सरचिटणीस-राष्ट्रवादी काँग्रेस
अध्यक्ष–बहुजन ब्रिगेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom