शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा बहुजन ब्रिगेड तर्फे निषेध

शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा बहुजन ब्रिगेड तर्फे निषेध

प्रतिनिधी—अकलूज—सक्त वसूल संचालनालय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे,या घटनेचा बहुजन ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला,सदर निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांचा या घोटाळ्याशी कसलाही संबध नसताना सक्त वसूल संचालनालय यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे,ज्या व्यक्तीचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या प्रकरणाला भाजप सरकार जबाबदार असून,त्यांच्यावर केलेली कारवाई सुडबुद्दीने केली आहे,तसेच या भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला ED असेल किंवा सरकारी यंत्रणा हाताशी धरून त्यांचा आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत असून हे सरकार हिटलरच्या वृत्तीने वागत असून त्यांची हुकूम शाही गाजवण्यात तरबेज असल्याचा आरोप बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केला आहे, सक्तवसुल संचलनालय याचा व महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.तसेच
या सरकारच्या काळात लोकशाही जिवंत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे,लोकशाही देशात असे अनेकांचे आवाज बंध करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे,या राज्यासह देशामध्ये हे भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे,म्हणून या भाजपच्या हुकूमशाहीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.असेही किरण साठे शेवटी म्हणाले त्यांच्या बरोबर दामू शेख,कृष्णा लांबटे हे शेतकरी व बहुजन ब्रिगेड संघटनेचे सागर कोळी,बापू कांबळे,आनंद मिसाळ,उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom