महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठिंब्याला मोठे यश;

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव ९,९२८ मतांनी विजयी!

प्रतिनिधी: पुणे : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ स्मिता जाधव या विरोधी उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे. या महाविजयामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरणसाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व स्तरांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी’तण, मन आणि धनाने’ केलेल्या प्रचाराचा सिंहाचा वाटा ठरला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षप्रमुख किरण साठे यांनी पुण्यात सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन त्यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला होता. यावेळी माजी सनदी अधिकारी,जलयुक्त शिवार योजनेचे प्रणेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. साठे यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या संपूर्ण यंत्रणेने मतदारसंघात प्रचाराची राळ उडवून दिली होती.पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी अत्यंत चुरशीची ठरली असून पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या फेऱ्यांनंतर सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांनी एकूण ९ हजार ९२८ हून अधिक मताधिक्याने (मतांच्या फरकाने) दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षप्रमुख किरणसाहेब साठे यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने आपले घरदार सोडून, ‘तण, मन आणि धनाने’ मैदानात उतरून काम केले. पदवीधरांच्या बेरोजगारी, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही घेतलेली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले. या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित आमदार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom