माळखांबी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘महाराष्ट्र विकास सेना’ आक्रमक; थेट उपसले आमरण उपोषणाचे हत्यार!

माळशिरस: माळशिरस तालुक्यातील माळखांबी ग्रामपंचायत मधील सन २०२२ ते २०२६ या कालावधीत झालेल्या विकासकामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत, महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने आजपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. ‘कामे फक्त कागदावर, प्रत्यक्ष जागेवर काहीच नाही, तरीही बिले मात्र काढली’ असा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. या संदर्भातील सविस्तर मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती माळशिरस यांना देण्यात आले आहे.माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे, सरचिटणीस सतीश साठे, शहराध्यक्ष सागर सरतापे, ऋषिकेश साठे आणि महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, आज उपोषणाचा पहिला दिवस आहे.गेल्या चार वर्षांच्या कालावधीत माळखांबी ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकासकामांसाठी शासकीय निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, यातील बहुतांश कामे प्रत्यक्ष जमिनीवर झालीच नसून, केवळ खोटे दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखो-कोट्यवधी रुपयांची देयके (बिले) हडप करण्यात आल्याचा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. ग्रामस्थांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि या कालावधीतील सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.जोपर्यंत या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याचे लेखी आश्वासन आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे ठोस पाऊल प्रशासन उचलत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बिभीषण साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. ऐनवेळी सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे तालुक्यात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom