
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्या ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकलूज मधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप व उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रम महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे, प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.