पुणे जिल्ह्यातील वन विभागात उडाली खळबळ !

उपवनसंरक्षक पुणे यांच्या चौकशी साठी SIT नेमण्याची मागणी

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे वनमंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन! 4 मे रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण

प्रतिनिधी :पुणे:महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री गणेश नाईक व वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे,निवेदनात पुणे प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक महादेव नामदेव मोहिते व उदयसिंग कुंभार यांच्या चौकशी साठी SIT ची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदनाच्या पुढील कार्यवाहीसाठी प्रती सक्तवसुली संचालनालय, (ED),कार्यालय:कैसर-ए-हिंद बिल्डिंग,करीमभॉय रोड,बॅलार्ड इस्टेट,मुंबई,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र,राज्य मुंबई,वनसंरक्षक सो प्रादेशिक विभाग पुणे वनवृत पुणे,विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातीन वनविभागात खळबळ उडाली आहे.दिनांक 29 मार्च 2026 रोजी पुणे उपवनसंरक्षक कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनक्षेत्र सर्वेक्षक उदयसिंग कुंभार यांना चार लाख रुपयांचे लाच स्वीकारताना अटक केली होती.उदयसिंग कुंभार यांनी जमिनीच्या कागदपत्रांशी संबंधित कामासाठी व जमिनीचे रेस्टोर्ड ऑर्डर मिळवून देण्यासाठी संबंधित शेतकरी यांच्याकडे लाच मागितली होती.कार्यालयीन प्रमुखांशिवाय म्हणजे उपवनसंरक्षक पुणे यांच्या संमतीशिवाय लाचेची मागणी केलीच जाऊ शकत नाही.उदयसिंग कुंभार यांच्या मार्फत श्री महादेव मोहिते यांनी मोठ्या प्रमाणात माया गोळा केली असण्याची शक्यता जनतेमधून वर्तवली जात आहे. असे निवेदनात म्हटले आहे.उपवनसंरक्षक पुणे येथील कार्यालयात कार्यरत असलेले उपवनसंरक्षक श्री महादेव मोहिते यांनी उपवनसंरक्षक पुणे येथे पदभार घेतल्यापासून ते दिनांक 26 मार्च 2026 पर्यंत वनविभागाने पूर्वी वाटप केलेल्या जमिनीचे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी जमीन कक्षामधून परवानगी देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून उपवनसंरक्षक पुणे कार्यालयाकडून उदयसिंग कुंभार यांनी कुणाच्या आशीर्वादाने व कुणाच्या सांगण्यावरून किती रक्कम वसूल केली आहे? याची चौकशी करण्यात यावी आणि उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची आणि त्याच्या नातेवाईक यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. तसेच उदयसिंग कुंभार यांनी कुणाच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांकडून लाच घेतली आणि आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांकडून लाच घेतली याचीही चौकशी करण्यात यावी.उपवनसंरक्षक पुणे येथे महादेव मोहिते यांनी कार्यालयात पदभार घेतल्यापासून पुणे जिल्ह्यात प्रादेशिक विभाग वाऱ्यावर सोडून दिला आहे. विभागामध्ये कार्यरत असलेल्या सर्व तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात ते अयशस्वी ठरलेले आहेत.वरील कालावधील जमीन कक्षामधून वर्ग दोन ची जमीन वर्ग एक करण्यासाठी दिलेल्या सर्व परवानगीधारक शेतकरी,उदयसिंग कुंभार आणि उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या बाबतीत वरील नमूद मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी.तसेच SIT मार्फत महादेव मोहिते यांनी कामाला लागल्यापासून ते दिनांक 14 एप्रिल 2026 अखेर पर्यंत त्यांच्याकडे एकूण असलेल्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी.अन्यथा आपल्या मंत्रालयासमोर दिनांक 04/05/2026 रोजी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी वनमंत्री व अतिरिक्त प्रधान सचिव यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom