
अकलूज मधील महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाचे पुण्यामध्ये पडसाद!
अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे नंबर आमच्याकडे आले आहेत,गाडी दिसली की कारवाई होणारच? – संबंधित अधिकारी
गाडी मालक पोलीस प्रशासनाच्या बाबतीत चुकीची माहिती सार्वजनिक करीत असल्याची चर्चा
प्रतिनिधी : अकलूज ते पुणे होणारी अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास युवा सेना माळशिरस तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांनी गांधी चौक अकलूज येथे दिनांक २१ एप्रिल पासून बेमुदत आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.मात्र आर टी ओ कार्यालय ठोस अशी कारवाई करीत नाही.त्यामुळे आदित्य काकडे आंदोलनावर ठाम आहेत.जोपर्यंत अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या संपूर्ण पने बंद होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे काकडेनी सांगीतले.माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास यास सर्वस्वी आर टी ओ आणि इतर प्रशासकीय अधिकारी व कार्यालये जबाबदार राहतील. तसेच अकलूज,स्वारगेट,हडपसर,दौंड, इंदापूर,बावडा, पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आली आहेत त्याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे.तसेच एसटी महामंडळ यांनीही या आंदोलनाची दखल घेतली आहे.त्यामुळे पुणे ते अकलूज अवैध्य प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निश्चय काकडे यांनी केला आहे.याच मागणीसाठी सोलापूर आर टी ओ यांना निवेदन दिले आहे,सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर दिनांक २ मे रोजी बेमुदत आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर दिनांक ३० एप्रिल रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.संबंधित वाहनधारक हे अकलूज माळशिरस,नातेपुते पोलीस स्टेशन, स्वारगेट,हडपसर,दौंड,इंदापूर यांना व अकलूज आर टी ओ व पुणे आर टी ओ यांना हप्ते देत असल्याचे खाजगी मध्ये बोलत आहेत.म्हणून आमच्या गाड्या कुणीही अडवू शकत नाहीत असे छाती ठोकून सांगत आहेत.आणि सर्व पोलीस स्टेशनची बदनामी करीत आहेत अशी चर्चा गांधी चौक परिसरात असलेल्या जनतेमध्ये सुरू आहे. त्यामुळे पुणे येथील आर टी ओ कार्यालय, अकलूज येथील आर टी ओ कार्यालय व अकलूज स्वारगेट,हडपसर,दौंड इंदापूर येथील पोलीस स्टेशन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे अकलूज ते पुणे अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे नंबर त्यांच्याकडे आल्याचे सांगीतले आहे. गाडी पुण्यात आली की आर टी ओ, एसटी महामंडळ आणि पोलीस यांची संयुक्त करवाई करणारच असे सांगितले आहे.