ऊर्जा मंत्रालयाचे थेट महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व जिल्हाधिकारी यांना आदेश

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाला मिळाले यश!

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आता दूर होणार!

प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ऐवजी ‘चौरस मीटर’ (Sq. Mtr.) प्रमाणे वाढीव मोबदला मिळावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ६ एप्रिल पासून आंदोलनाचा सुरुवात करण्यात आली होती.आंदोलनाला माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे,सत्यवान लोंढे, विनोद पवार,किशोर निकम उपस्थित होते.आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मंत्रालयाततील ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांची दिनांक ७ एप्रिल रोजी मंत्रालयात भेट घडवून आणली.भेटीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये मागण्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व जिल्हाधिकारी सोलापूर यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.प्रधान सचिव यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांना उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांचे सहसचिव उ.र.दहिफळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या.प्रकाशगंगा,वांद्रे- कुर्ला संकुल,वांद्रे पूर्व मुंबई व जिल्हाधिकारी सोलापूर यांना चौकशी करण्यासाठी आदेश दिल्याचे पत्र पाठवले आहे.चौकशी करण्याच्या आदेशात २२० केव्ही भाळवणी पंढरपूर माळीनगर लिलो २२० की.व्ही.वाहिनीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोबदला देताना वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत.पंढरपूर तालुक्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई चौ.मी.देण्यात आली आहे व माळशिरस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टर प्रमाणे काढली जात आहे.हेक्टरी निकषामुळे चौ.मी.च्या तुलनेत मिळणारी रक्कम अत्यंत कमी असून माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.एकाच वाहिनीकरता दोन वेगवेगळ्या तालुक्यात दोन वेगवेगळे निकष लावने अन्यायकारक आहे,त्यामुळे माळशिरस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीचा मोबदला चौ.मी.प्रमाणे देण्यात यावा.हे मुद्दे तपासून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून संबंधितांना परस्पर कळवण्यात यावे व त्याबाबतचा अहवाल शासनास माहितीस्तव सादर करावा असे आदेश दिले आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर होणार आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom