गृहराज्यमंत्री योगेश कदम व पंकज भोयर यांची किरण साठे यांनी घेतली भेट

पोलीस भरती प्रक्रियेत असलेल्या धावण्याच्या अंतरावर सकारात्मक चर्चा

प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या मैदानी चाचणीसाठी मुलांना 1600 मीटर अंतर धावणे तर मुलींसाठी 800 मीटर अंतर धावणे अशी अट आहे ती अट शिथिल करून मुलांसाठी 1200 मीटर अंतर करण्यात यावे तसेच मुलींसाठी 600 मीटर करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण चे गृहराज्यमंत्री पंकज भोयर तसेच शहरे विभागाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रालयामध्ये असलेल्या त्यांच्या दालनात पक्षप्रमुख किरण साठे यांनी भेट घेवून निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,करकंब शहर अध्यक्ष शिवाजी शिंदे,पप्पू गायकवाड, विकास केसकर उपस्थित होते.गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वतः जातीने लक्ष घालून हा विषय मंत्रिमंडळासमोर मांडणार आहे असे आश्वासन दिले.तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविणार असून स्वतः लक्ष घालणार असल्याचे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांना आश्वासन दिले आहे.दोन्ही गृहराज्यमंत्री यांनी आमची मागणी गांभीर्याने घेतली आहे.त्या मागणीसंदर्भात विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली चर्चा त्यांच्या कानावर घातली त्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.असे साठेनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom