
प्रतिनिधी
बोरगाव पंचायत समिती गणासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांनी अचानक माघार घेतल्याने आणि त्यांच्या वरती बोरगाव गावातील काही प्रस्थापित लोकांनी दबाव आणल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा बोरगाव जिल्हा परिषद गटासाठी महादेव पांडुरंग साठे यांचा अर्ज ठेवण्यात आला आहे त्याच पद्धतीने पंचायत समितीचा उमेदवाराने अचानक माघारी घेतल्याने पंचायत समितीच्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा संपूर्ण पंचायत समिती गण मध्ये सुरू आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाने पंचायत समिती गणासाठी नोटाचा वापर करण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये जोर धरू लागली आहे