

महादेव साठे, अलकाबाई साठे यांचा बोरगाव,माळखांबी येथे गावभेट दौरा
प्रतिनिधी
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महादेव साठे आणि पंचायत समिती गणामध्ये अलकाबाई साठे निवडणूक लढवित आहेत,यांच्या गावभेट दौऱ्याप्रसंगी तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी मारुती मंदिरामध्ये नारळ वाढवून सुरुवात केली. बोरगाव आणि माळखांबी येथील गावभेट दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे,बोरगाव व माळखांबी गावामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाने केलेल्या कामाच्या संदर्भात जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत,त्यामुळे बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या माळखांबी,बोरगांव गावामध्ये प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.यावेळी माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे, माढा विधानसभा संघटक बिभीषण साठे,माढा विधानसभा संघटक राहुल साठे,मार्गदर्शक सुनील साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.