
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा कण्हेर,इस्लामपूर,मांडवे गावाचा गावभेट दौरा –
प्रतिनिधी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मांडवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आनंद मिसाळ यांनी इस्लामपूर, मांडवे,कण्हेर येथे गावभेट दौरा केला.इस्लामपूर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नेते आणि बौद्ध/महार समाजाचे नेते बापूसाहेब वाघमारे यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली.तसेच कण्हेर येथे मातंग समाजाचे नेते उमाजी मिसाळ यांची भेट घेण्यात आली.आणि मांडवे येथे बाळू मिसाळ, आबासाहेब लवटे यांची भेट घेण्यात आली.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मांडवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आनंद मिसाळ हे बौद्ध/महार समाजाचे असल्याने त्यांच्या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मांडवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे,मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये असलेला बौद्ध/महार समाज यावेळी एकवटला असल्याचे दिसून आले.त्यामुळे मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवार कुणाची डोकेदुखी ठरणार हे निकालानंतरच समजणार आहे.