
गावभेट दौऱ्याप्रसंगी उत्साहपूर्ण प्रतिसाद
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये असलेल्या तरंगफळ,गारवड, गोरडवाडी या गावामधील शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत गावभेट दौरा केला आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये मुक्ताबाई साठे यांना खुल्या प्रवर्गामधून उमेदवारी देण्यात आली आहे,या मतदारसंघात मातंग समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून मातंग समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे, महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून गावभेट दौरा करण्यात आला त्यामध्ये मातंग समाजामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवारी मुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. मुक्ताबाई साठे यांच्या उमेदवारीने भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची अडचण होणार आहे.

