
बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी
प्रतिनिधी: बोरगाव: महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये बोरगाव,माळखांबी,उघडेवाडी, बोंडले,धानोरे,गावांमध्ये शाखा असून या शाखेच्या माध्यमातून बोरगाव जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असून नुकत्याच बोरगाव या मोठ्या गावामध्ये पक्षाची बैठक आयोजित करून पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आयोजित करून शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाला बोरगावातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र विकास यांना पक्षांमध्ये इन्कमिंग झाले असून बऱ्याच कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची घोषणा या अगोदरच करण्यात आली असून या बोरगावातील कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटामध्ये अधिकच त्यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे,त्याच पद्धतीने गावकऱ्यांना अपेक्षित असलेले विविध प्रश्न घेऊन ७ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण ही आयोजित केले आहे.त्यामुळे या जिल्हा परिषद गटांमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पार्टीच्या लोकांना वरचढ ठरणार असून या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा पंचायत समितीचा उमेदवार व जिल्हा परिषदेचा उमेदवार चांगलं मताधिक्य घेऊ शकतो अशी चर्चा संपूर्ण बोरगाव जिल्हा परिषद गटांमध्ये सुरू आहे.