
करकंब (प्रतिनिधी):माढा विधानसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे महाराष्ट्र विकास सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. राजेश खरे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि प्रामुख्याने करकंब जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत २४५ माढा मतदारसंघात तब्बल चार क्रमांकाचे मताधिक्य घेऊन खरे यांनी प्रस्थापित राजकारण्यांना आपली ताकद दाखवून दिली आहे.सर्वसामान्यांचा आधार: ‘ mvs स्टाईलने प्रश्न सुटणारराजेश खरे यांची ओळख केवळ एक राजकीय नेता म्हणून नाही, तर ‘संकटकाळातील मित्र’ म्हणून सर्वसामान्यांच्या मनात आहे. मग तो पोलीस स्टेशनचा विषय असो, दवाखान्यातील अडचण असो किंवा शेतकऱ्यांच्या वीज आणि पाण्याचा प्रश्न; राजेश खरे आपल्या खास ‘वेगळ्या स्टाईल’ने तो मार्गी लावतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. करकंब परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांनी केलेल्या कामांमुळे युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळते.करकंब गटातून उमेदवारीसाठी समर्थकांचा दबावविधानसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता करकंब जिल्हा परिषद गटातून राजेश खरे यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा या भागातील जनतेतून व्यक्त होत आहे. “आमची कामे करणारा माणूस आमचा प्रतिनिधी असावा,” ही भावना करकंब आणि परिसरातील गावांमध्ये प्रबळ होत आहे. खरे यांनी प्रत्येक गावात वैयक्तिक संपर्क वाढवला असून, लोकांच्या सुख-दुःखात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.आगामी रणनीती काय?राजेश खरे जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून उतरणार की किंगमेकरची भूमिका बजावणार, यावर सध्या खलबते सुरू आहेत. मात्र, त्यांच्या एका निर्णयावर करकंब गटाचे संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून आहे. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या गोटातही चिंतेचे वातावरण पसरले आहे.”महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राजेश खरे यांची तोफ करकंब जिल्हा परिषद गटात धडाडणार की काय, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
मी नेहमीच जनतेच्या सेवेला प्राधान्य दिले आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रेम हीच माझी खरी पुंजी आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.”— राजेश खरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,