सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या उमेदवारांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या खेळीने बसला फटका

महाराष्ट्र विकास सेना पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार – साईराज अडगळे

प्रतिनिधी: अकलूज :अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाला एकूण मतदान करणाऱ्या 345 मतदारांचे युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे यांनी आभार व्यक्त केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष व इतर चार प्रभागांमध्ये उमेदवार उभा करण्यात आले होते त्या उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मिळून 345 मतदारांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेल्या नारळ या चिन्ह समोरील बटन दाबून मतदान केल्याने त्यांचे पक्षाच्या वतीने अडगळे यांनी आभार मानले आहेत.अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला असल्याची तसेच प्रत्येकी सात ते दहा हजार रुपयांचा रेट या निवडणुकीत निघाला असल्याची चर्चा अकलूज मधील प्रत्येक चौकात चौकातून सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाने या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उडी घेतली आणि एकही रुपया कोणाला न वाटता अकलूज शहरातील स्वाभिमानी 345 मतदारांनी त्यांना मतदान केले. ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाने पैसे न वाटता घेतलेली मते ही त्यांच्या कामाची पावती आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाला बाजूला सारून 345 लोकांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाला स्वीकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूज मधील ज्या जनतेने महाराष्ट्र विकास सेना पक्षाला मतदान केले आहे त्यांचे आभार मानले आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने उमेदवार उभा केल्याने सत्ताधारी एक आणि विरोधी पार्टीच्या दोन उमेदवारांचा पराभव झालेला दिसून येत आहे.सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या उमेदवारांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या खेळीने फटका बसल्याची चर्चा संपूर्ण अकलूज शहरातील जनतेमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom