वेळापूर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन…..

प्रतिनिधी: : वेळापूर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन व अनावरण पक्षप्रमुख किरणसाहेब साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते मोठया उत्साहत साजरे करण्यात आले,यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,तालुका सरचिटणीस सतीश साठे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,युवा सेना जिल्हा प्रवक्ते रोहित वाघमारे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने तसेच वेळापूर शाखेचे शहाराध्यक्ष विजय बनकर,मार्गदर्शक महादेव शिवपालक,उपाध्यक्ष ओंकार पाटोळे,कार्याध्यक्ष सौरभ खंडाळे,संपर्क प्रमुख सागर सागर शिंदे,संघटक अजिनाथ साठे, संघटक आजिनाथ साठे सचिव प्रवीण वाघमारे सरचिटणीस रामेश्वर बोराडे संपर्कप्रमुख ओंकार अडगळे,सहसंघटक सागर शिंदे सहसचिव अविनाश बनसोडे,प्रज्वल बनकर नितीन नाईक नवरे ओमकार उघाडे, रोहित अडगळे,ओम दीक्षित,समीर नदाफ,राहुल भगत,साकल्प पाटील,उघडेवाडीचे शाखा अध्यक्ष रोहित साठे,बोडले गावाचे शाखा अध्यक्ष सचिन दनाने,माऊली साठे,मकरंद दनाने,खंडाळी गावचे विठ्ठल खंडागळे यांच्यासह वेळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…उदघाटन प्रसंगी बोलताना पक्षप्रमुख किरण साठे यांनी वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे,तशी घोषणाही त्यांनी केली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगून पदाधिकारी यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने वेळापूर मधून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
