
वेळापूर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन
प्रतिनिधी: वेळापूर:
महाराष्ट्र विकास सेना पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.माळीनगर,बोरगाव, पिलीव,दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.अशी माहिती पक्षाचे प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी दिली.तद्नंतर वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे,प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे, तालुका उपाध्यक्ष धनाजी पाटील, युवा सेना जिल्हा प्रवक्ते रोहित वाघमारे,वेळापूर शहराध्यक्ष विजय बनकर,महादेव शिवपालक,अजित साठे,उपाध्यक्ष ओंकार पाटोळे, विनोद भगत, विठ्ठल खंडागळे यांच्या सह अनेकजन उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने वेळापूर जिल्हा परिषद गटाकडे मोर्चा वळविला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करण्यात आली आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यात आली. महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माळशिरस तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली असल्याने अनेकांची अडचण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्ष तालुक्यातील किती जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार उभा करणार हे येणारा काळच ठरवेल, तालुक्यातील राजकारण मात्र महाराष्ट्र विकास सेना पक्षाने ढवळून काढले आहे यात मात्र शंका नाही.