ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण केले गरम…

मविसे पक्षाचा दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये दौरा…

प्रतिनिधी: : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी दहिगाव जिल्हा परिषद गटाचा दौरा केला असून त्यामध्ये,एकशिव,कळंबोली दहिगाव या गावांमध्ये पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा विनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांचे मत जाणून घेतले.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्ष दहिगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवणार असून या निवडणुकीमध्ये दहिगाव येथील उमेदवार देणार असल्याची दाट शक्यता असून दहिगाव हे लोकसंख्येने मोठे गाव असून त्या ठिकाणचा उमेदवार देण्याला महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्राधान्य देणार आहे.अशी चर्चा सुरू झाली आहे.दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या दहिगाव,एकशिव,कळंबोली, गुरसाळे,मोराची येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सद्या कार्यरत आहेत.त्यामुळे या गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या भुमिका निर्णायक ठरू शकते. लवकरच महाराष्ट्र विकास सेना पक्षाची दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात येणार आहे त्यामध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळीनगर, बोरगाव,पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.आता दहिगाव मध्ये कुणाची उमेदवारी जाहीर केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.ऐन थंडीच्या दिवसात महाराष्ट्र विकास सेना पक्षाने वातावरण तापवण्याचे सुतोवाच दिले आहेत आणि तशी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.भर थंडीच्या दिवसात महाराष्ट्र विकास सेना पक्षाने वातावरण गरम केल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom