
प्रभाग क्रमांक ९ मधून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवार ज्योती सकट यांचा उमेदवारी अर्ज मंजूर
ज्योती सकट यांच्या उमेदवारीने निवडणुकीत येणार रंगत
प्रतिनिधी: अकलूज अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ मधून ज्योती सकट यांनी अर्ज दाखल केला आहे आणि तो अर्ज छाननी मध्ये मंजूर झालेला आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा हक्काचा प्रभाग क्रमांक ९ म्हणून ओळखला जातो. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक महिला व ग्रामस्थांची कामे केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये होणारी लढत महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवार यांच्या मुळे रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये घेतलेल्या आढावा बैठकीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज शहरांमध्ये विविध कामे करण्यात आली असून त्या कामाच्या जोरावरती प्रभाग क्रमांक ९ मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवार ज्योती सकट यांची भूमिका गेमचेंजरची ठरणार आहे.