
प्रभाग क्रमांक ११ मधून महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून आशुतोष उर्फ सुजित साठे यांचा उमेदवारी अर्ज मंजूर
आशुतोष साठे यांची उमेदवारी बजावणार किंगमेकरची भूमिका
प्रतिनिधी: अकलूज अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधून आशुतोष उर्फ सुजित साठे यांनी अर्ज दाखल केला आहे आणि तो अर्ज छाननी मध्ये मंजूर झालेला आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा हक्काचे प्रभाग क्रमांक ९ आणि ११ म्हणून ओळखला जातो. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ११ मधील अनेक महिला व ग्रामस्थांची कामे केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये होणारी लढत महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवार आशुतोष उर्फ सुजित साठे यांच्या मुळे रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये घेतलेल्या आढावा बैठकीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज शहरांमध्ये विविध कामे करण्यात आली असून त्या कामाच्या जोरावरती प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवार आशुतोष उर्फ सुजित साठे यांची भूमिका किंगमेकरची ठरणार आहे.