
प्रभाग क्रमांक ६ मधून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे गिरीराज माने यांची उमेदवारी अंतीम : माने ठरू शकतात प्रभावी उमेदवार
प्रतिनिधी : अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ६ मधून गिरीराज उर्फ किसन माने यांनी अर्ज दाखल केला आहे आणि तो अर्ज छाननी मध्ये मंजूर झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवार गिरीराज उर्फ किसन माने हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रभावी उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा संपूर्ण प्रभाग क्रमांक ६ मध्ये सुरू आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज शहरांमध्ये विविध कामे करण्यात आली असून त्या कामाच्या जोरावरती प्रभाग क्रमांक ६ मध्ये गिरीराज उर्फ किसन माने हे विजय होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये इतर उमेदवार फक्त निवडणुकीत येतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष गायब होतात अशी चर्चा संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहे त्यामुळे किसन उर्फ गिरिराज माने यांची उमेदवारी लक्षवेधी ठरणार आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे.