अकलूज मधील जनता स्वावलंबी व स्वाभिमानी आहे,कुणावर अवलंबून नाही – अनिल साठे

अकलूज मधील जनता स्वावलंबी व स्वाभिमानी आहे,कुणावर अवलंबून नाही – अनिल साठे

निवडणुकीत स्वाभिमानी बाणा असणाऱ्या मविसे पक्षाच्या पाठीमागे उभी राहिल

प्रतिनिधी: अकलूज: अकलूजकरांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून गेली दोन वर्ष झालं वेगवेगळ्या प्रश्नावरती काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे धाडस या पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल आहे.गावातील रस्ते,गटारी, पिण्याचे पाणी,शौचालय या सर्व प्रश्नावरती महाराष्ट्र विकास सेना पक्षाने आतापर्यंत काम केलेल आहे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाने अकलूजच्या जनतेसाठी रस्त्यावरती उतरून मोर्चा,आंदोलने सर्व गोष्टी केलेल्या आहेत.या केलेल्या कामाच्या जोरावर अकलूज कर जनता महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठीमागे उभे राहिल.असे मत मविसे पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी सर्वसामान्य जनता व सर्वसामान्य माणूस यांना केंद्रबिंदू मानून त्यांना भेडसावणारा प्रश्न हा स्वतःचा प्रश्न आहे,ही भावना ठेवून अकलूज मध्ये गेली पंधरा वर्षे काम केलेल आहे. पंधरा वर्षे केलेल्या कामाची कामाची पावती नगरपरिषद निवडणुकीमध्ये मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी व्यक्त केली.

तसेच अकलूज मधील जनता स्वावलंबी व स्वाभिमानी आहे आणि कुणाच्या कुबड्या घेऊन जगणारी जनता नाही,कुणावर अवलंबून न राहता कष्ट करून जगणारी आहे, त्यामुळे अकलूज मधील जनतेमध्ये स्वाभिमानाची भूमिका जागृत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व स्वाभिमानी बाणा असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठीमागे अकलूज नगरपरिषद निवडणुकीत उभी राहिल असा विश्वास अनिल साठे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom