
मांडवे जिल्हा परिषद गटाची निवडणूक महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्वबळावर लढवणार ?
मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांची डोकेदुखी वाढणार ? मविसे राजकीय गणित बिघडवणार?
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामधील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे,त्याच पार्श्वभूमीवरती माळीनगर जिल्हा परिषद गट, बोरगाव जिल्हा परिषद गट महाराष्ट्र विकास सेना पक्षाने मेळावे आयोजित करून उमेदवारांची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे,या उमेदवाना संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.लवकरच दहिगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामध्ये कुणाच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही जागेवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.त्यानुसार पक्षाच्या मांडवे पंचायत समिती गणामध्ये अनिता मिसाळ उतरणार असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे. पक्षप्रमुख किरण साठे यांनी स्वतः या जिल्ह परिषद गटामध्ये लक्ष घातले आहे,मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्यासाठी दोन ते तीन इच्छुक उमेदवार यांनी संवाद साधला असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविली गेल्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल यात मात्र शंका नाही.