
एकशिव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा पदाधिकारी मेळावा संपन्न
शाखेच्या फलकाचेही अनावरण…
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवरती दहिगाव जिल्हा परिषद गटातील एकशिव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे फलकाचे अनावरण करण्यात आले,तसेच एकशिव गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावाही पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.शाखेमध्ये अध्यक्ष सचिन अवघडे,उपाध्यक्ष राहुल तुपे सचिव आकाश सकट कार्याध्यक्ष महेश अवघडे संघटक दीपक तुपे खजिनदार अमित अवघडे सरचिटणीस रणजीत अवघडे यांच्यासह असंख्य सदस्यांनी शाखेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.कार्यक्रमाला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे माळशिरस तालुका अध्यक्ष माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे तालुका सरचिटणीस सतीश साठे, तालुका संघटक अविनाश गायकवाड,अकलूज शहर संघटक चेतन साठे, दहिगाव शहराध्यक्ष सचिन खिलारे,किसन खिलारे,पिराळे शहराध्यक्ष राहुल खिलारे,रोहन सोनवणे, वैभव खिलारे,परशुराम लांडगे,प्रमोद जावीर,दादा कांबळे यांच्यासह शाखेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती साठी राखीव जागा असून या गटामध्ये व दोन्ही गणामध्ये निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष अग्रेसर असल्याचे स्पष्ट मत पक्षप्रमुख किरण साठे यांनी व्यक्त केले.तसेच दहिगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने गटातील सर्व गावातील पदाधिकारी यांना बोलावून भूमिका घेण्यात येणार असल्याचे सांगितले आणि दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र विकास सेना पक्ष या जिल्हा परिषद गटामध्ये कुणाला संधी देणार हे दहिगाव येथील मेळाव्यात ठरणार आहे.माळखांबी,बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि गणामध्ये संभाव्य उमेदवार यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार कधी घोषित करण्यात येणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.