
सौ.उमाताई राजेश खरे रोपळे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा?
महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उतरणार!
प्रतिनिधी: रोपळे:पंढरपूर तालुक्यातील रोपळे जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला साठी राखीव झाला आहे.या गटामधून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,तशी चर्चा रोपळे जिल्हा परिषद गटामध्ये सुरू झाली आहे,या निवडणुकीमध्ये राजेश खरे यांनी त्यांच्या पत्नीला उभे केल्यास या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे राजेश खरे यांच्या पत्नीच्या उमेदवारीला पक्षाकडून हिरवा कंदील दाखवला असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राजेश खरे यांनी पंढरपूर तालुक्यांमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची काम महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून काम केले आहे,पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक शोषित वंचित पीडितांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत,त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा रोपळे जिल्हा परिषद गटामध्ये सुरू आहे.