

महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्वबळावर लढण्याची घोषणा !
माळीनगर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा
प्रतिनिधी: महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळीनगर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला माळीनगर जिल्हा परिषद गटांमधील पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय होती.सदर मेळाव्याला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश, जिल्हा,तालुका,शहर,शाखा स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.माळीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेले श्री संजय हेगडे,इंजिनिअर सागर नाईकनवरे,तसेच लवंग पंचायत समिती गणामधून सौ शोभा लवटे,माळीनगर गणांमधून विठ्ठल खंडागळे हे संभाव्य उमेदवार उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला सेनेच्या शाखेचे अनावरण माळीनगर येथे करण्यात आले.मेळाव्याला संबोधित करताना पक्षप्रमुख किरण साठे यांनी माळीनगर जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या दोन जागांची निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केली.त्यामुळे तालुक्यात महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी केलेली घोषणा चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्याचे जाहीर करून महाराष्ट्र विकास सेना पक्षाने तालुक्यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या भूमिकेकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.ऐन दिवाळीच्या सणांमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने फटाका फोडण्यात आला आहे.किरण साठे यांनी केलेल्या घोषणेने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील खिलारे यांनी केले तर आभार माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांनी मानले.