स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्याची घोषणा

महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्याची घोषणा

अकलूज येथे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न

प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक दिनांक १५ ऑक्टोबर रोजी अकलूज येथे पार पडली. बैठकीला प्रदेश सचिव अनिल साठे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख धनाजी साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे, माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे, युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे, तालुका उपाध्यक्ष सतीश साठे यांच्या सह तालुक्यातील तालुका स्तरावरील पदाधिकारी शहर अध्यक्ष,सर्व शाखा अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना पक्षप्रमुख किरण साठे यांनी पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्याची घोषणा केली आहे.निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आल्याने पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला असल्याचे दिसून आले.बैठकीत बिभीषण साठे,बोंडले येथील मकरंद दनाने,मांडवे येथील बाळासाहेब मिसाळ,माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन बाळासाहेब कांबळे यांनी केले तर आभार माळशिरस तालुका उप कार्याध्यक्ष अतुल पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom