माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढणार – मविसे

माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढणार – मविसे

मविसे तालुका अध्यक्षप धनाजी जाधव पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथील विश्रामगृहात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.सदर बैठकीत माळशिरस तालुका अध्यक्षपदी मराठा समाजाचे धडाडीचे नेते धनाजी जाधव पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय हेगडे,तालुका सरचिटणीस सतीश साठे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,उपाध्यक्ष दीपक कांबळे,महिला सेनेच्या लवटे मॅडम,तालुका उपाध्यक्ष सतीश साठे, विठ्ठल खंडागळे,आत्माराम खंडागळे, आबा लांडगे,विठ्ठल जावीर, कण्हेर शहराध्यक्ष अरुण मिसाळ,शैलेश भोसले,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबदल सत्काराला उत्तर देताना धनाजी जाधव पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले.माळशिरस तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे जाळे पसरले आहे. पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र विकास सेना पक्षाची या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार आहे असेही त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom