
फुले दाम्पत्य,साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी
प्रतिनिधी : भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयासमोर जंतर मंतर मैदानात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले,साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या मागणीसाठी दिनांक ११ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे उपस्थित होते.सदर उपोषणाची दखल घेवून जंतर मंतर मैदानाचे पोलिस विभागाचे प्रभारी अधिकारी जितेंद्र राव यांनी प्रधानमंत्री कार्यालयात भेटीसाठी पाठविले.त्यावेळी प्रधानमंत्री कार्यालयातील अप्पर सचिव मनीदार सिंग यांनी निवेदन स्वीकारले.आमची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

