राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या कार्यालयासमोर मविसे पक्ष करणार आमरण उपोषण

राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या कार्यालयासमोर मविसे पक्ष करणार आमरण उपोषण

आ.साठे,फुले दाम्पत्य यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

प्रतिनिधी : नवी दिल्ली:

भारत सरकारच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु व श्री प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी राष्ट्रपती भवन व प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली येथे जावून निवेदन दिले आहे.निवेदनात साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना दिनांक 01/08/2025 पर्यंत मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे उपस्थित होते.राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना दिलेल्या निवेदनात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान आणि केलेले काम आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले सामाजिक,शैक्षणिक कार्य याचा उल्लेख केला आहे.१/८/२०५ पर्यंत भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन आणि प्रधानमंत्री कार्यालासमोरील जंतर मंतर मैदानात ७/८/२५ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom